कोल्हापूर विद्यापिठाकडून सौ सौफिया मुल्ला यांना पीएचडी पदवी प्रदान
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :
कोल्हापूर विद्यापिठाने नुकत्याच घेतलेल्या दिक्षान्त समारंभात डॉ सोफिया अहमद मुल्ला यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली त्या निमित्त शुभम भारत गॅस एजन्सीचे सर्वेसर्वा व नामदेव समाजोन्नती परिषद चे जिल्हाध्यक्ष इंजि.सुनील पोरे व सौ सुवर्णा पोरे यांनी शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार केला या प्रसंगी बोलताना इंजि पोरे म्हणाले सौ सोफिया मुल्ला या .पीएचडीची उच्च पदवी मिळविणाऱ्या माण तालुक्यातील एकमेव मुस्लिम महिला असून त्यांचे सर्व कुटुंब सु़शिक्षित आहे आमचे मित्र प्राध्यापक अहमद मुल्ला यांनी कठोर परिश्रम घेऊन आपल्या दोन्ही मुलांना डॉक्टरीचे शिक्षण दिले व या वयात त्यांच्या पत्नीने मुलाचे शिक्षण नोकरी व घरप्रपंच सांभाळत कठोर परिश्रम करून ही पीएचडीची उच्च पदवी प्राप्त केली त्यांचा हा आदर्श घेण्यासारखा आहे
डॉ सोफिया मुल्ला या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सादर
केलेल्या Biolinguistic study of English language, aquisition and production या विषयावरील प्रबंधाला पी.एच् .डी देऊन गौरविण्यात आले आहे.त्या माण तालुक्यातील पीएचडी मिळविणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला असल्याने त्या़चे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे सौ सुवर्णा पोरे यांनी गौरवोद्गार काढले