कर्मचाऱ्याचे निवृत्ती चे वय ५८ ऐवजी ५० करावे :दादासाहेब दोरगे
व्हिजन २४ तास न्युज (संपादक: अहमद मुल्ला )
म्हसवड
सध्या लाखोच्या संखेने राज्यात तरुण बेरोजगार असून शासन दरबारी कर्मचाऱ्याचे निवृत्ती चे वय ५८ ऐवजी ६० करण्याच्या हालचाली सुरु असून यामुळे बेरोजगारांची संख्या अधिक वाढणार असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष . दादासाहेब दोरगे यांनी व्यक्त केले
शासनाकडून निवृत्ती चे वय ५८ ऐवजी ६० करणे हे चुकीचे आहे सध्या राज्यात. तरुणाईच्या हाताला काम नाही. लाखो तरुण बेरोजगार आहेत. वाढत्या प्रदुषणा मुळे वय वाढलेल्या कर्मचारी वर्गाचे कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होत असून त्यांच्याकडून जादा काम होण्याऐवजी कामात चुका होण्याची जास्त शक्यता आहे. वाढत्या वयाच्या कर्मचाऱ्यांना बी पी, शुगर, ब्रेन हमरेज, पॅरालिसीस सारखे रोग होताना दिसत आहेत.
आयुष्य भर शिक्षण लग्न मुलं बाळ त्यांचे शिक्षण, मुलाची लग्न, घर इ. मुळे त्यांना जीवनाचा खरा आनंद व सुख घेता येत नाही. त्यामुळे निवृत्ती चे वय ५८ ऐवजी सर्वांचेच ५० होणे गरजेचे आहे.५० ते ५८ च्या फरकाने लाखो तरुणांना नोकरी मिळेल. एकाच व्यक्ती ला नोकरी पगार पेन्शन वाढ सारखे आर्थिक लाभ मिळाल्या मुळे सामाजिक आर्थिक दरी वाढत चालली आहे. त्यामुळे नोकरीतून निवृत्ती चे वय वाढवण्याऐवजी कमी होणे ही काळाची गरज असंल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष .दोरगे दादासाहेब मांडले आहे