कोविड- १९ व Influenza आजाराकरिता उपाययोजना व घ्यावयाच्या काळजी : जिल्हाधिकारी सातारा

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्युज म्हसवड
सातारा
              सदयस्थितीत महाराष्ट्र राज्यात वाढत असलेल्या Seasonal Influenza आजार आणि कोविड- १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी व उपाययोजना राबविणेकामी मा. सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक सचिव- २ / कोविड-१९/३८४/२०२३ दि.३१/३/२०२३ अन्वये आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करणेबाबत सूचित केलेले आहे.
                 कोविड- १९ व Influenza ची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेणेस त्रास, निमोनिया, ताप इत्यादी प्राथमिक लक्षणे आहेत. सदर कोविड- १९ विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेवाटे त्याचप्रमाणे शिंकणे, खोकणे हस्तांदोलन इत्यादी कारणांमुळे होतो. सदर आजाराचे अनुषंगाने ५० वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व किडनीचे आजार असलेले तसेच, ज्या नागरिकांना यापूर्वी कोविड- १९ ची लागण होऊन गेलेली आहे (Post covid) अशा नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी वेळोवळी व जेवणांपूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, शिंकताना, खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, हस्तांदोलन टाळावे, चेहरा, नाक व डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये आणि विशेष म्हणजे गरज नसतांना गर्दीचे व बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे.
शासनाच्या निर्देशानुसार सदर आजाराची व्यापती वाढू नये, यासाठी सातारा जिल्हयात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सातारा जिल्हयातील सर्व प्रकारची शासकीय / निमशासकीय कार्यालये, तसेच बँका, शाळा, महाविदयालये इत्यादी मधील सर्व शासकीय विभागातील अधिकारी / कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर दैनंदिन करणे अनिवार्य आहे.
तसेच गर्दीच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी (आठवडे बाजार, एसटी स्टॅण्ड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठया प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे) इ. ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. तसेच सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा.
      सदर परिपत्रकातील नमूद निर्देशांची तात्काळ काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची जबाबदारी सातारा जिल्हयातील सर्व संबंधीत विभाग प्रमुखांची राहील यांची गांर्भियाने नोंद घ्यावी.
                                                                                           (रुचेश जयवंशी)
                                                                                       जिल्हाधिकारी सातारा
                                                                 तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!