बिजवडी ग्रामविकासासाठी ना.निलम गोर्हे यांनी दिला दहा लाख निधी
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
बिजवडी:प्रतिनिधी
सातारा जिल्हा शासकीय दौर्यावरती असलेल्या विधान परिषद उपसभापती ना.निलमताई गोर्हे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले यांचे बिजवडी गावाला भेट दिली.याप्रसंगी मा.गोर्हे यांनी बिजवडी ग्रामविकासासाठी तात्काळ १० लाख निधी दिल्याचे जाहीर केले.यावेळी त्यांचा सत्कार सौ.रोहिणी भोसले, सौ.लतिका भोसले,यांनी शाॅल व पुष्पगुच्छ देउन केला.
याप्रसंगी तालुका संघटक ठाकरे गट रामभाऊ जगदाळे,युवा तालुका संघटक कृष्णा आवळे,फलटन तालुकाप्रमुख विकास नाळे, तहसिलदार ,चेअरमन बिजवडी प्रजोत भोसले,सरपंच आप्पासो अडागळे, दगडू जगदाळे विभागप्रमुख,डाॅ.निकम,संभाजी जगदाळे,प्रा.माने सर,माजी प्राचार्य हनुमंत भोसले सर विकास पवार,नामदेव भोसले,अनिल गोसावी,लालासो पवार ,विठ्ठल काळोखे ,अक्षय रोमन,लाल पाटील ,सोसायटी संचालक पलू गाढवे ,सुभाष शिणगारे ,व शेकडो बिजवडीकर उपस्थित होते