गणेश काटकर यांचा भाजपा मध्ये प्रवेश

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज(संपादक;अहमद मुल्ला )
  By;विठ्ठल काटकर
कुकुडवाड/वार्ताहर
       माण तालुक्यातील वडजल तालुका माण येथील राहिवासी गणेश काटकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती मध्ये मुंबईत भाजप मध्ये प्रवेश केला.
                 याबाबत अधिक माहिती अशी की गणेश काटकर यांनी पुर्वी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक म्हणून काम केले असून ते क्रांती मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. गणेश काटकर यांनी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात  तसेच कोकण मुंबई शहर ठाणे नवीमुंबई येथे सुद्धा मोठं वादळ निर्माण करण्यात गणेश काटकर यांचा मोठा सहभाग राहिला आहे.गणेश काटकर हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, यांचे कट्टर समर्थक मानले जातात. गणेश काटकर यांच्या कामाचा आवाका पाहता,यांचा भाजपा प्रवेश झाल्यामुळे पक्षाला मोठा फायदा होईल असे पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
                या कार्यक्रमास मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुरेश खाडे, भाजप मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे उपस्थित होते खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, आमदार श्रीकांत भारती, आमदार आशिष शेलार,यांच्यासह, भाजपचे वरिष्ठ नेतेमंडळी यांनी  गणेश काटकर यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!