८ मार्च २०२३’ जागतिक महिला’ दिनानिमित्त सातारा जिल्हा पोलीस दलाचे वतीने महिलांचा सन्मान

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
By; सादिक शेख  पोलीस टाईम्स रिपोर्टर
       गोंदवले खुर्द ;
                  . समीर शेख पोलीस  अधीक्षक, सातारा व . बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक ०८/०३/२०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा पोलीस दलाचे वतीने शिवतेज हॉल सातारा येथे मा. श्रीमती शितल जानवे – खराडे, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांचे प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिनाचे आयोजन भरोसा सेल स्थागुशा सातारा यांचे वतीने करणेत आले होते.
                          सदर कार्यक्रमास श्री. पाटील पोलीस उपअधीक्षक (गृह) सातारा व सातारा पोलीस पब्लिक स्कुल सातारा च्या मुख्याधीपिका श्रीमती स्नेहांकिता पवार व सातारा जिल्हयातील एकूण १२५ ते १५० महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार उपस्थित होते. नमुद कार्यक्रमा दरम्यान उपस्थित सर्व महिला अधिकारी व अंमलदार यांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा व गुलाब पुष्प देण्यात आले. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून सातारा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या एकूण १ महिला पोलीस अधिकारी व १५ महिला अंमलदार यांना प्रशंसापत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर सातारा पोलीस कल्याण विभाग व जनरल प्रॅक्टीशनर असोशिएशन सातारा यांचे संयुक्त विदयमाने सातारा पोलीस दलातील महिलांचे आरोग्यविषयी शिबीर घेण्यात आले त्यामध्ये जनरल प्रॅक्टीशनर असोशिएशन सातारा यांचे कडील डॉ. वृंदा कुलकर्णी व त्यांचे पथक यांनी महिला पोलीस अंमलदार यांचे दैनंदिन आरोग्यविषयक तपासणी करुन मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमामध्ये सत्कारमुर्तीनी व उपस्थितीत महिला पोलीस अंमलदार यांनी आपले मनोगत व्यक्त करुन अशा उपक्रमांमुळे दैनंदिन कामकाज करण्याकरीता प्रोत्साहन मिळाले असे सांगितले. सदरवेळी मा. पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई श्रीमती शितल जानवे – खराडे, मा. पोलीस उपअधीक्षक (गृह) सातारा श्री. पाटील यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. सदरचा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!