लोधवडे शाळेच्या मुलींच्या संघाने जंगबाज मैदान मारीत सातारा जिल्ह्यात जबरदस्त  कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड
By ; सादिक शेख
गोंदवले खुर्द ;
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श गाव लोधवडे ता. माण येथील विद्यार्थी खेळाडू संघ आणि शिक्षक यांनी नादच केला भारी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेनंतर्गत  काल शाहू स्टेडियम सातारा येथे घेण्यात आलेल्या सांघिक रस्सीखेच स्पर्धेतील  मुलींच्या लहान गटातील रस्सीखेच स्पर्धेत जिल्हा स्तरावरील झालेल्या अटी तटीच्या तुल्यबळ लढतीमध्ये लोधवडे शाळेच्या मुलींच्या संघाने जंगबाज मैदान मारीत सातारा जिल्ह्यात जबरदस्त  कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकवून जिल्ह्यातअव्वल होण्याचा बहुमान मिळविला आहे याचा सर्वांनाच अभिमान वाटत आहे आम्हाला कालच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आणून आम्हाला दिली आश्चर्यकारक अनोखी वाढदिवसाची भेट*सातारा जिल्ह्याच्या प्राथमिक विभागाच्या सन्मानीय शिक्षणाधिकारी आदरणीय मा. शबनम मुजावर मॅडम यांचे शुभ हस्ते  मानाचा चषक, प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल स्विकारताना जिल्हा परिषद शाळेचा मुलींचा खेळाडू संघ मार्गदर्शक शिक्षक सतेशकुमार माळवे सर ,श्री दिपक कदम सर ,सातारा जिल्ह्यातील काही सन्मानीय अधिकारी व सातारा जिल्ह्यातील क्रीडा समनवयक*

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!