म्हसवडचे पोष्ट ऑफिस असुन तोटा नसून खोळंबा
व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड
By ; Ahmad Mulla
म्हसवड
म्हसवड शहरात असलेल्या पोष्ट कार्यालयात कर्मचारीच नसल्याने नागरीकांना पोष्ट ऑफिसला थडका देऊन यायची वेळ आली आहे म्हसवड हे माण तालुक्यातील सर्वात मोठे व एकमेव नगरपालिका असणारे शहर असून याठिकाणी ग्राहकांच्या सेवेसाठी असणारे पोष्ट ऑफिस आणी या ऑफिस मध्ये गेले कित्येक दिवसापासून एकच कर्मचारी ही किती मोठी शोकांतीका आहे या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकाना कर्मचारी नसल्यामुळे कोणतीही सुविधा मिळत नाही कोणतेही काम वेळेवर होत नाही मग हे पोष्ट ऑफिस असून तोटा नसून खोळबाच आहे
आज पुर्वी प्रमाणे पोष्ट ऑफिसचे महत्व राहिले नसले तरी आजही नागरीका़ना व्यापारी वर्गाना पोष्ट ऑफिसमध्ये स्पिड रजिस्टर, स्पीड बुकिंग, डिपॉझिट सेवा पोष्टाची आर डी भरने सरकारी पत्रव्यवहार सरकारी नोकऱ्यासाठी अर्ज भरणे इ.कामासाठी पोष्ट ऑफिसला जावे लागते आणी आज या पोष्टात कर्मचारीच नसल्यामुळे ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र असुन जेष्ठ नागरीकांना आपल्या हक्काच्या पैशासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने यापुढे आता पोष्टात गुंतवणुक नको रे बाबा असेच आता म्हसवडकर म्हणत आहेत.
आजच्या डिजीटल युगात पोष्ट कार्यालयाला आलेली मरगळ झटकुन टाकण्यासाठी केंद्र शासनाने बदलत्या काळानुसार पोष्ट कार्यालय व तेथील सुविधा ही डिजीटल करीत पोष्ट खात्यामार्फत अनेक योजना राबवण्यास सुरुवात केल्याने पोष्टापासुन दुर गेलेले नागरीक पुन्हा या खात्याशी जोडल्याचे चित्र आहे. शासनाने या खात्याच्या सोयी सुविधा वाढवल्या मात्र या खात्यामधील कर्मचारी संख्या वाढवल्या नाहीत उलट आहे त्यात कमी केले आहे परिणामी या सोयी सुविधांचा पुरता बोजवारा उडाल्याने सर्वसामान्य नागरीक पोष्ट कार्यालयात जाण्याचे टाळु लागला आहे.
म्हसवड शहरात असलेल्या पोष्ट कार्यालयात तर एकच पोष्टमास्तर कार्यरत असुन अन्य दोन सहाय्यकाची पदे रिक्त असल्याने एकट्याचीच कसरत सुरु आहे, एकच व्यक्ती पोष्टाचा सर्व कारभार संभाळत असल्याने नागरीकांना पुरेशी सेवा ही व्यक्ती देवु शकत नाही. म्हसवड शहरात अनेक जेष्ठ नागरीकांनी आपली गुंतवणुक या खात्याकडे केली आहे काहींची मुदतही संपली आहे त्यामुळे अनेक जेष्ठ नागरीक या कार्यालयात खेटे मारत आहेत मात्र उद्या या हे एकच वाक्य त्यांना नेहमीच ऐकवल जात असल्याने आम्ही जिवंत असेपर्यंत तरी आमचे पैसे परत मिळतील का ? असा उद्दीग्न सवाल सध्या जेष्ठ नागरीकांतुन विचारला जात आहे. तर सेवा सुविधा देता येत नसतील तर हे कार्यालयच बंद करा अशा संतापजनक प्रतिक्रिया ही म्हसवडकरांतुन येत आहेत.
सदरचे खाते हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने या खात्यातील अधिकारी वा कर्मचारी काहीसे बेधुंद होवुन वागत आहेत, आपणाला कोणी विचारु शकत नाही असा समज या सर्वांचा झाला असल्यानेच नागरीक येतील बोंबलतील अन् जातील आम्हाला त्याचा काय फरक पडणार अशा मस्तीत असणाऱ्या या कार्यालयातील अधिकाऱ्यांना कोणीतरी सामान्यांचा वाली बनुन जाब विचारण्याची वेळ आली आहे.कर्मचारी मिळत नसतील तर हे ऑफिस बंद करा पोष्ट ऑफिस म्हणजे असून तोटा नसून खोळबाच आहे अशाच प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करत आहेत