गोंदवले बु !! येथील रस्त्याचे काम त्वरीत चालू करा अन्यथा मनसेचे रास्ता रोको आंदोलन : धैर्यशील पाटील

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज
By ; Ahmad Mulla
म्हसवड ;
            मेघा इंजिनिअरिंग कंपनी विरोधात मनसे आक्रमक झाली असून गोंदवले बु ।। येथील  रस्त्याचे थांबलेले काम त्वरीत चालू न केल्यास मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
                   गोंदवले बु येथे मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या  कंपनी ने गावातील रस्त्याचे काम बरेच दिवसापासून बंद ठेवलेले आहे  त्यामुळे गावकऱ्यांना व येणाऱ्या जाणाऱ्या वाहानाना खुपच त्रास सहन करावा लागत आहे रस्ता बनवण्याकरीता येणाऱ्या अडचणी सुटल्या असताना देखील कॉन्ट्रॅक्टर    रस्त्याचे काम चालू करत नसल्याने व सर्वसामान्य नागरीकांना त्रास सहन करावा लागत असल्याने मनसे आक्रमक झाली असून सदर कंपनीने गुरुवार, दि.०२/०३/२०२३ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत रस्त्याचे काम व गतिरोधक चालू न केल्यास भव्य रस्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
             सोबतच संबंधित कंपनीची वाहनेही फिरू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा देखील धैर्यशील पाटील यांनी घेतला आहे. गोंदवले ग्रामस्थांना सोबत घेत आंदोलनाचे निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदार व दहिवडी पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.
                     यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह मनसे विद्यार्थी हे सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, निलेश कट्टे, विशाल कट्टे, धीरज कट्टे, विश्वराज कट्टे, प्रथमेश नवले, लखन पारसे, विठ्ठल जाधव, युवराज पाटील, आशुतोष कट्टे, रोहित कट्टे, रणजीत पडमलकर, प्रतीक सत्रे, रणजीत जाधव व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!