नातेवाइकांनी बालिकेस घेऊन जाण्याचे आवाहन
व्हिजन २४ तास न्युज
By: Ahmad Mulla
म्हसवड
मागील सहा महिने उलटून गेले तरी मरियम महिबूब आतार (वय सहा महिने) या बाळास कमी वजन व अपूर्ण दिवसाचे या कारणास्तव नातेवाइकांनी ५ ऑगस्ट २०२२ ला कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू विभागात उपचारास सोडले.
त्यानंतर बाळास पुन्हा पाहण्यास आले नसल्याने टाळाटाळ करत बाळाचा परित्याग करण्याच्या उद्देशाने स्त्री जातीच्या बाळास पालक सोडून गेले. त्यांना घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. कऱ्हाड शहर पोलिसांत गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी बालकल्याण समिती, सातारामार्फत बाळाला म्हसवड येथे द्रोणागिरी शिक्षण संस्था संचलित शिशुगृह संस्थेत २० जानेवारीला संरक्षण व संगोपनासाठी दाखल केले आहे.
या बालिकेच्या आईचा- वडिलांचा शोध घेऊन अद्याप ही बालिकेच्या नातेवाइकांनी संपर्क साधलेला नाही. नातेवाइकांनी बाल कल्याण समिती, निरीक्षणगृह, सातारा अथवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बस स्टँडच्या पाठीमागे प्रशासकीय इमारत दुसरा मजला, सातारा अथवा द्रोणागिरी शिक्षण संस्था संचलित शिशुगृह (दत्तक केंद्र) म्हसवड संस्थेशी एक महिन्याच्या आत संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
अन्यथा बालिकेचे शासकीय नियमानुसार पुनर्वसन करण्यात। येईल.