म्हसवड पोलींसानी दोन ठिकाणी छापा टाकून अवैध वाळू उपसा करत असलेल्या दोन ट्रॅक्टरसह १३ लाख १०हजार रुपए किमतीचा मुद्देमाल केला जप्त

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्यूज
BY ; Ahmad Mulla
म्हसवड
                    मा. अपर  पोलीस अधीक्षक सो यांच्या अवैध धंदया विरोधात कारवाई संबंधी सूचनाप्रमाणे व मा. उपविभागीय अधिकारी दहिवडी सो   सूचना व मार्गदर्शनाखाली आज दिनांक १३/०२/२०२३ रोजी पहाटे पळशी गावामध्ये माण नदीपात्रात दोन ट्रॅक्टर चालक अवैध वाळू वाहतूक करताना त्यांना मिळून आल्याने. त्यांच्या विरोधात  म्हसवड पोलीस ठाणेत गुरनं  ४६/२०२३ व गुरनं  ४७/२०२३ IPC 379 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ९,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून एकुण १३ लाख,१०हजार रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यातील आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांवर पुढील कारवाई   स.पो.नि राजकुमार भुजबळ यांचे मार्ग दर्शनाखाली  पोलीस हवालदार डी पी खाडे   करत आहेत.
गुन्हा क्र १
गुन्हयाची थोडक्यात हकिकत* :-  दिनांक  १३/०२/२०२३ पहाटे पळशी गावामध्ये माण नदीपात्रात     इसम सागर जिजाबा खाडे वय 20 वर्षे रा.पळशी .माण जि.सातारा  हा त्याचे ताब्यातील एक महिंद्रा कंपनीचा ४५ हॉर्सपावरचा लाल रंगाचा ट्रँक्टर  (MH ११ G ४६९८ )व त्यांच्या पाठीमागील लाल रंगाची डंपिंग ट्रॉली  (MH ११ BD ४२७८ ) मधुन वाऴुचे अवैध्य उत्खनन  करुन  स्वताचे आर्थिक फायद्या  करिता  चोरटी वाहतुक करित  असताना मिळुन आला  त्याच्या विरुद्ध म्हसवड पोलीस ठाणे गु र नं  ४७/२०२३ IPC ३७९पर्यावरण सरंक्षण अधिनियम कलम ९,१५ प्रमाणे.गन्हा दाखल करण्यात आला
त्याच्याकडून
  1)   ५,00,000/- रुपये किमतीचा   एक महिंद्रा कंपनीचा  ट्रॅक्टर
  2) १,00.000/-एक  लाल रंगाची डंपिंग ट्रॉली
 3)५,000/- रुपये किंमतीची एक ब्रास  वाळु असा एकूण  अंदाजे  ६ लाख ५ हजार रुपए किमतीचा मुद्देमाल जप्त  करुन सागर जिजाबा खाडे यास अटक करण्यात आली
   सदर गून्ह्याचा पूढील तपास डी पी खाडे पोलीस हवालदार  ब नं ३७६   हे  म्हसवड पोलीस ठाणे हे करीत आहेत
गुन्हा क्र २
गुन्ह्याची थोडक्यात हकिकत* :
दिनांक  १३/०२/२०२३  पहाटे पळशी गावामध्ये माण नदीपात्रात  अजित बाळासो खाडे वय २२ वर्षे राहणार पळशी तालुका माण जि  सातारा हा लाल रंगाचा ट्रॅक्टर ( नंबर MH 45 s 5262) व त्याच्या पाठीमागील लाल रंगाची डम्पिंग ट्रॉली ( MH ११ CG २३५९) मधून वाळूचे अवैद्य उत्खनन करून    स्वतःचे आर्थिक फायदा करिता चोरटी वाहतूक करीत असताना पकडण्यात आले   त्याच्याकडून म्हसवड पोलीसांनी
  १) ६,00,000/-रुपये  किमतीचा एक महिंद्रा कंपनीचा 45 हॉर्स पावर चा लाल रंगाचा ट्रॅक्टर
  २)१,00,000/-रुपये एक लाल रंगाची डम्पिंग ट्रॉली
 ३)५000/-रुपये किमतीची एक ब्रास वाळू अंदाजे असा अंदाजे ७ लाख ५ हजार रुपए किमतीचा मुद्देमाल जप्त करुन अजित खाडे यास अटक करण्यात आली त्याच्या विरुद्ध म्हसवड पोलीस ठाणे गु र नं  ४७/२०२३ IPC ३७९पर्यावरण सरंक्षण अधिनियम कलम ९,१५ प्रमाणे.गन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर गून्ह्याचा पूढील तपास डी पी खाडे पोलीस हवालदार  ब नं ३७६   हे  म्हसवड पोलीस ठाणे हे करीत आहेत

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!