उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची वडगाव शाळेस भेट.* *विद्यार्थी व शिक्षकांचे केले कौतुक.*
व्हिजन २४ तास न्यूज
BY :दौलत नाईक
दहिवडी; ( प्रतिनिधी )
वडगांव तालुका माण येथील जिल्हा परिषद शाळेस उस्मानाबादचे जिल्हाधिकारी मा. सचिन ओंबासे यांनी सदिच्छा भेट दिली व विद्यार्थी प्रगतीचा आढावा घेतला.
भेटीदरम्यान जिल्हाधिकारी साहेबांनी इयत्ता तिसरीच्या वर्गात गणित व इंग्रजी विषयाची तयारी पहिली. तयारी पाहून आनंद व्यक्त केला व विद्यार्थ्यांना शाबासकी दिली. तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी केलेले पाढे पाठांतर व गोष्टीच्या पुस्तकाचे वाचन पाहून शिक्षकांच्या कार्याचेही विशेष कौतुक केले.
शाळेचे मुख्याध्यापक संजय खरात यांनी जिल्हाधिकारी साहेबांचे स्वागत व सत्कार केला.त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. शाळेच्या भौतिक सुविधांचा आढावा घेऊन विविध योजनेद्वारे त्या पूर्ण करण्यासंदर्भात गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास वडगावचे सरपंच अजिनाथ ओंबासे, उपसरपंच संजय पाटील ,ग्रामसेवक सुरेश माने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील नागरगोजे तसेच शाळा विकास समितीचे सदस्य आनंदराव ओंबासे व हरिश्चंद्र ओंबासे सर तसेच सुधाकर ओंबासे उपस्थित होते. शाळेच्या उपशिक्षिका अश्विनी राऊत यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. व सोपानराव मोटे यांनी आभार मानले.