पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून १७ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करुन चोरीस गेलेला ३४,७२,००० /- रुपये किमतीचे ६२ तोळे सोन्याचे दागिणे व ४०००/- रुपये किमतीचे चांदीचे दागिणे हस्तगत.
व्हिजन २४ तास न्यूज
BY ;सादिक शेख प्रतिनिधी
गोंदवले खुर्द;
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापु बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी
सातारा जिल्हयातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर
स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या होत्या.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकचे एक तपास पथक तयार करुन त्यांना घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना
दिल्या. पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी पोलीस अभिलेखावरील आरोपी संजय अंकुश मदने रा. वडुथ
ता. जि. सातारा यास कोरेगाव पोलीस ठाणे गु.र.नं. ०९/२०२३ भादविक ४५७, ३८० या गुन्हयाचे तपासामध्ये
अटक करुन नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १३,७९,००० /- रुपये किमतीचा मुद्देमाल व गुन्हयात वापरलेले ६,००,००० /- रुपये किमतीचे वाहन असा एकूण १९,७९,००० /- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. नमुद गुन्हयाचे तपासामध्ये पोलीस अभिलेखावरील आरोपी संजय अंकुश मदने याचेकडे
सखोल व कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता त्याने व त्याचे साथिदार यांनी वडुथ, बोरखळ, मालगाव, जळगाव, तडवळे, खेड नांदगिरी, चिमणगाव, देऊर, वाठार या गावामध्ये घरफोडया केल्या असल्याचे सांगितल्याने आरोपी संजय अंकुश मदने यास सातारा तालूका पोलीस ठाणे गु.र.नं.३६८/२०२२ भादविक ३५८,
३८० या गुन्हयामध्ये वर्ग करुन घेवून त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने सातारा तालूका, कोरेगाव व
वाठार पोलीस ठाणे हद्दीतील खालील नमुद १७ घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचे सांगून नमुद आरोपीकडून १७ घरफोडीच्या गुन्हयातील एकूण ६२ तोळे सोन्याचे दागिणे व ४००० रुपये किमतीचे
चांदीचे दागिणे असा मिळून ३४,७६,००० /- रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आलेलेआहेत.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे पोलीस
उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, विजय कांबळे, संजय शिर्के, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रविण फडतरे, लक्ष्मण जगधने, निलेश काटकर, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, मोहन पवार, वैभव सावंत, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाणे, पृथ्वीराज
जाधव, मयुर देशमुख, केतन शिंदे, शिवाजी गुरव यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.