शिक्षण हे प्रगतीचे प्रवेशद्वार ….. . . विठ्ठल काटकर
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
BY ;Ahmad Mulla
म्हसवड..
मानवी जीवनात शिक्षण हे प्रगतीचे प्रवेशद्वार असल्याचे प्रतिपादन माण तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार विठ्ठल काटकर यांनी म्हसवड येथे केले.
कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड येथे वार्षिक परितोषिक वितरण व इयत्ता 12 बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल काटकर उपस्थित होते.कार्यक्रमास संस्था सचिव सुलोचना बाबर,प्राचार्य विठ्ठल लवटे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल काटकर म्हणाले माणसाच्या सर्वांगीण प्रगतीचे मूळ शिक्षण आहे.सध्य परिस्थितीत शिकेल तोच टिकेल, व वाचाल तरच वाचाल याबाबत तपशीलवार माहिती देऊन वाचनाची आवड जोपासण्याचे आवाहन काटकर यांनी केले.मानवी जीवनात ध्येय, धाडस ,नेतृत्व कर्तुत्व आणि दातृत्व ही महत्त्वाची पंचसूत्री आहे.शालेय जीवन हे आपल्या आयुष्याचा पाया भक्कम करण्याचा महत्त्वाचा कार्यकाल असतो. ही संधी वाया घालू नका, भरकटत जाऊ नका.चांगली संगत धरा, भरपूर अभ्यास करून शाळेचे व आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल करण्याचे आवाहन काटकर यांनी केले.
पुढे बोलताना काटकर म्हणाले यशस्वी जीवनात चांगल्या संस्काराची शिदोरी महत्त्वाच्या असते.ही शिदोरी आई वडील व गुरुजना शिवाय शक्य नाही. उच्च ध्येय ठेवा. संकटा विरुद्ध संघर्ष करा,गरिबीची जाण ठेवा, शक्य होईल तेवढे मोबाईल पासून दूर राहा .घेता आले तर त्यातून चांगले घ्या.या निमित्ताने काटकर यांनी स्पर्धा परीक्षा तसेच विविध शिष्यवृत्ती परीक्षा बाबत मार्गदर्शन केले.क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापन, उपक्रमशीलता,तसेच श्री व सौ बाबर दांपत्यां च्या शैक्षणिक कार्य प्रगतीचा गौरव केला व या संकुलास उज्वल भवितव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निमित्ताने संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर,संस्था सचिव सुलोचना बाबर, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी चेतना जाधव, सुरज वीरकर, वृषाली शिर्के ,वैष्णवी साळुंखे, सागर बनगर, सिद्धेश ढोले,यांनी आपले भावनिक मनोगत व्यक्त केले तर प्राचार्य विठ्ठल लवटे आणि प्रास्ताविक केले.या निमित्ताने यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांचे आभार सानिका भोसले यांनी व्यक्त केले.