स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची दबंग कारवाई घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करुन चोरीस गेलेला १९,७९,०००/-रुपयेचा मुद्देमाल जप्त.
व्हिजन २४ तास न्यूज
सादिक शेख
गोंदवले खुर्द ; ( प्रतिनिधी )
दि.१०/०१/२०२३ रोजीचे २३.३० ते दि. ११/०१/२०२३ रोजीचे सकाळी ०९.१५ वा. चे दरम्यान फिर्यादी यांचे पाडळी ता. कोरेगाव जि. सातारा येथील राहते घरा शेजारी असणारे गोडाऊन मधून अज्ञात चोरटयांनी १४,७०,००० /- रुपये किमतीची पितळेच्या धातूची झुंबरे व सिलींग फॅन चोरी करुन नेले बाबत दिले फिर्यादीवरुन
कोरेगाव पोलीस ठाणे गु.र.नं.०९/२०२३ भादविक ४६१, ३८० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी नमुद आरोपींना पकडणे कामी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे अधिपत्याखाली एक तपास पथक तयार केले. दि.१६/०१/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी संजय अंकुश मदने रा. वडुथ ता. जि. सातारा याने सदरचा गुन्हा केला आहे, त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकास नमुद आरोपीस ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले. तपास पथकाने वडूथ ता.जि. सातारा येथे जावून प्राप्त माहितीमधील आरोपींवर लक्ष पुरवून त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे नमुद गुन्हयाचे अनुशंगाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगीतले असून गुन्हयात चोरी केलेल्या १५ सिलींग फॅन पैकी २सिलींग फॅन हस्तगत केले, तसेच उर्वरीत झुंबराचे साहित्य ज्या भंगार दुकानदारास विक्री केले होते ते दुकान दाखवून चोरीस गेलेले झुंबराचे साहित्य हस्तगत केले. नमुद आरोपीकडून गुन्हयात चोरीस गेलेला १९,७९,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, स्थानिक गुन्हे शाखा सातारा हे करीत आहेत. श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, संतोष सपकाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेचले, प्रविण फडतरे, लक्ष्मण जगधने, गणेश कापरे,निलेश काटकर, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाणे,शिवाजी गुरव यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन
केलेले आहे.