क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेजचा 99 % निकाल

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड:-
              महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने एच एस सी  परीक्षा 2024 चा निकाल नुकताच जाहीर केला.या परीक्षेमध्ये मध्ये क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेजचा 99 % निकाल लागला असून यशाची परंपरा कायम राखली.
            शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुल  अंतर्गत क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज मधील इयत्ता बारावी वर्गाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत एच एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल 99 % लागला.या कॉलेज मधील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक – पिसे आयुष सुरेश (92.33%),द्वितीय- खाडे शुभम जयेंद्र कुमार(86.67% ) तृतीय – खाडे मोहित नामदेव ( 85 %) चतुर्थ – धनवडे सुयश कृष्णा ( 82.67 % ) पाचवा – पवार प्रणव विष्णू ( 81.83 % ) गुण संपादन करून उज्वल यश मिळवीले.

       तसेच क्रॉप सायन्स या विषयात 200 गुणांपैकी मिळविलेले विद्यार्थी प्रथम – पिसे आयुष सुरेश (199 गुण), पवार प्रणव विष्णू 199गुण), सावंत रोहिणी शत्रुघ्न (198 गुण) कापसे करिष्मा रामचंद्र – ( 195 गुण) खाडे मोहित नामदेव ( 195 गुण ) तसेच माहिती व तंत्रज्ञान या विषयात 100 गुणा पैकी प्रथम – साळुंखे प्रथमेश जयवंत ( 98 गुण ) व्दितीय – शिर्के पृथ्वीराज मनोज ( 97 गुण ) विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
        कॉलेजमधील सर्व यशस्वी विद्यार्थांचे  संस्थेचे अध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर , संस्था उपाध्यक्ष-ADV. इंद्रजीत बाबर सचिव सौ.सुलोचना बाबर, प्राचार्य विठ्ठल लवटे व सर्व मार्गदर्शक प्राध्यापक तसेच पालक  या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!