माण- खटावचे आ.जयकुमार गोरे यांनी या भागासाठीच्या सिंचन योजना मार्गी लावत जनतेला दिलेला शब्द पाळला आहे.माण तालुक्याच्या उत्तरेकडील सिंचन योजनेपासून वंचित असलेल्या गावांनाही पाण्याचा शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण केला आहे. जिहे कटापूरचे पाणी आंधळी धरणात आणून ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे.या योजनेतून पहिल्या टप्प्यातील गावांची कामे सुरू आहेत.तर उत्तर माणधील उर्वरित बिजवडीसह इतर २२ गावे व पश्चिमेकडील महिमानगडसह ९ गावे अशा एकूण ३१ वंचित गावांनाही विस्तारित जिहे – कटापूर सिंचन योजनेतून पाणी देण्यासाठी १.१५ टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे.त्यातून या गावांना पाणी देण्यात येणार आहे.यासाठी याचे सर्वेक्षण करण्यात येत असून त्यासाठी ९६ लाख ७३ हजार रूपये मंजूर झाले आहेत. लवकरच याचा सर्वे पूर्ण होईल.त्यामुळे या योजनेतून उर्वरित गावांनाही पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहेअशी माहिती सिध्दनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरूण गोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
सिंचनापासून वंचित असणाऱ्या उत्तर माणमधील गावांना गुरुवर्य कै.लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेचे (जिहे कठापूर) पाणी मिळवण्यासाठी आ.जयकुमार गोरे यांनी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळेच जिहे कटापूरचे पाणी आंधळी धरणात पोहचले आहे.दि२१ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या पाण्याचे पूजन केले जाणार आहे.या योजनेपासून वंचित असलेली बिजवडीसह इतर गावांना जिहे कटापूर चे पाणी मिळणार नाही,त्यांचा या योजनेत समावेश नाही असे काहीजण वक्तव्ये करत जनतेची दिशाभूल करत आहेत.बिजवडीसह उर्वरित सर्व गावांना जिहे कटापूरचे पाणी देण्यासाठी आ.जयकुमार गोरे समर्थ आहेत.आजपर्यंत कोणत्याच राज्यकर्त्याला जमले नाही ते आ.गोरेंनी करून दाखवले आहे.त्यामुळे पाण्याची चिंता कोणी करू नये.या भागातील गावांना पाणी देण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे यासाठी निधीही मिळालला आहे.सर्वे पूर्ण झाला की ही कामेही सुरू होणार असल्याची माहिती अरूण गोरेंनी दिली.