मेरी माता हायस्कूल म्हसवडचे 8 बुद्धिबळपटू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडले
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी) :
मेरी माता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसवड येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील पहिलीच तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. दिनांक 30 ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेत माण तालुक्यातील तब्बल 50 हून अधिक शाळांमधील 150 पेक्षा जास्त बुद्धिबळपटूंनी 14, 17 व 19 वर्षांखालील गटांमध्ये दमदार खेळ सादर केला.
या कठीण स्पर्धेतून अखेरीस 30 खेळाडूंची जिल्हास्तरीय दिवस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, त्यात मेरी माता हायस्कूल म्हसवडचा ठसा उमटवत निधीशा देशमाने, धनश्री खांडेकर, कार्तिकी तिवाटणे, ईश्वरी माने, वीर पवार, विहान देशमाने, प्रज्वल भोते आणि सार्थक गायकवाड या आठ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत पंच म्हणून श्री. अभिजीत बावळे यांनी काम पाहिले. विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संतोष खासबागे, बंडोपंत लोखंडे व जोसेफ सर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत माण तालुका क्रीडा अधिकारी सौ. सुप्रिया गाढवे (आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या), माण तालुका शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष महेश बडवे सर, विद्यालयाचे प्राचार्य फादर सनू, फादर टॉमीचन, शिक्षकवृंद व पत्रकार बांधव उपस्थित होते.
या यशस्वी खेळाडूंचे सर्वांनी अभिनंदन करत पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

