म्हसवड म्हसवड शहरात एकाच दिवसात दुसरी चोरीची घटना घडली असून चोरट्यानी दिवसा ढवळ्या बंद घराचे कुलूप तोडून७० हजार ४०० रु.किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले
या घटनेची म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली बातमी अशी पोलीस स्टेशन पासून २किमी अंतरावर रोडवरील पाण्याच्या टाकी जवळ राहत असलेले नितीन मसु कांबळे वय 45 वर्षे यांच्या घरात सोमवारी सकाळी 11.30 वा. ते सायंकाळी 4.30 वा. चे दरम्यान म्हसवड, येथील आदित्य तृप्ती रेसीडेन्सी म्हाडा कॉलनी ,एफ बिल्डींग रुम नंबर 309 ,चे बंद दरवाज्याचे कुलुप तोडुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने घराचे आत प्रवेश करून घरफोडी चोरी करुन 22,000/- रु. किंमतीचा सोन्याची 10ग्रँम वजनाचा चैन, 26,400 /- रु. किंमतीचा सोन्याचे 12 ग्रँम वजनाचा मंगऴसुत्र, 22,000/- रु.किंमतीचा सोन्याचे 10ग्रँम वजनाचे कानातील वेल, फुले असा एकूण 70,400/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना घडली असून या बाबतची फिर्याद नितीन मसु कांबळे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे . एकाच दिवशी दिवसा ढवळ्या दोन ठिकाणी चोरट्यानी दुपारी साडे दहा ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान बंद घराची कुलपे तोडून लाखो रुपयाचे दागिने चोरून नेहल्याच्या घटनेने नागरिकांत घाबराट पसरली आहे या घटनेचा तपास सपोनि सखाराम बिराजदार करत असून, चोरट्यांना लवकरच पकडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. स्थानिकांनी देखील सतर्क राहून आपापल्या घरांची योग्य प्रकारे सुरक्षा करण्याचे आवाहन सपोनि सखाराम बिराजदार यांनी केले आहे