छाननीनंतर २८७ मतदारसंघात ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध २५८ माण विधानसभा मतदार संघात ३३ उमेदवार वैध व ०३ उमेदवार अवैध

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

मुंबई, दि. 31 :(महासंवाद )

    महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.29 ऑक्टोबर 2024 रोजीपर्यंत राज्यातील 288 मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत 7 हजार 995 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची दि. 30 ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात आली. राज्यातील 287 मतदारसंघातील एकूण 7 हजार 967 उमेदवारांपैकी 7 हजार 050 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर 917 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

56 – नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात 27 उमेदवारांपैकी 22 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर 04 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या मतदारसंघातील एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी ( 31 ऑक्टोबर) पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

२५८ माण विधानसभा मतदार संघासाठी दिनांक ३०.१०.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी २५८ माण विधानसभा मतदारसंघ यांचा कक्षात छाननी करणेत आली आहे एकूण नामनिर्देशपत्र ४६ त्यापैकी ५ नामनिर्देशपत्र अवैध करणेत आले आहे. एकूण ३६ उमेदवारापैकी ३३ उमेदवार वैध व ०३ उमेदवार अवैध ठरविणेत आले असल्याची माहिती .निवडणूक निर्णय अधिकारी २५८-माण विधानसभा मतदारसंघ यांनी दिली आहे

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!