म्हसवड येथे ६७३वी संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक अहमद मुल्ला )
म्हसवड
     म्हसवड येथील शिंपी समाजाचे वतीने सातारा नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांचे मार्गदर्शनाखाली संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ६७३ वी संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला
     या वेळी पहाटे काकड आरती अभिषेक आदी झाले वर झांज पथक ढोल ताशा यांचे गजरात विठ्ठल रखुमाई निवॄती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई नामदेव महाराज यांचें जिवंत व्यक्ती रेखा यांचें उपस्थितीत पालखी नामदेव मंदिर येथुन कोष्टी गल्ली भगवान गल्ली सिध्दनाथ मंदिरात येथुन मेन बाजार पेठेतुन कासार गल्ली विठ्ठल मंदिर राम मंदिर शिवाजी चौक रामोशी वेसीतुन पालखी नामदेव मंदिरात आली दरम्यान आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या सुविदय पत्नी सौ सोनियाताई गोरे, जावळीचे माजी आमदार सदाशिवराव सपकाळ,भाजप ओबीसी युवक मोर्चा प्रदेशाध्यक्ष करण भैय्या पोरे यांचे सह अनेकांनी पालखीचे दर्शन घेतले मंदिरात काल्याच्या किर्तनाने फुल टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी समाजातील विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेल्या व्यक्तीचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आले महाप्रसादाचे नियोजन अतुल फुटाणे व कुटुंबीय यांचे वतीने करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजातील आबालवृद्ध यांनी परिश्रम घेतले जीवंत व्यक्ती रेखा व नीटनेटकेपणा विशिष्ट पोशाख या बाबी गावांत चर्चेचा विषय ठरला…

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!