राज्यात नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठी ६ ऑक्टोबरला सोडत

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे काढण्यात येणार आहे. नगर विकास विभागाकडून यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

सदर सोडत मंत्रालयातील परिषद सभागृह, सहावा मजला येथे होणार असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रत्येक राजकीय पक्षाचे केवळ दोन प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यासाठी संबंधित पक्षांचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी दोन प्रतिनिधींची शिफारस करुन त्यांना आरक्षण सोडतीसाठी पाठविण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

ही सोडत प्रियांका कुलकर्णी-छापवाले, उप सचिव (नगर विकास विभाग) यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *