वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त सलग ५ वर्ष विविध सामाजिक उपक्रम – तेजस देशमुखांचे कौतुक
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला,
प्रतिनिधी उध्दव सरोदे, अर्धापूर (नांदेड)
बारड (ता. मुदखेड) येथील प्रगतशील शेतकरी कै. संतोषराव उर्फ बापू किशनराव देशमुख बारडकर यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करण्यात आले. या वेळी “वडिलांचे पुण्यस्मरण हे मदतीच्या कार्यातून सामाजिक उपक्रम राबवून करणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे” असे प्रतिपादन बारड ग्रामपंचायतीचे मा. उपसरपंच बाळासाहेब शंकरराव देशमुख यांनी केले.

यावेळी वरद वॉटर सप्लायर्स, देशमुख गल्ली बारड येथे संगणक प्रणालीद्वारे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे १५० लोकांची तपासणी करण्यात आली, तर ४० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप झाले. तसेच १० रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.
सन २०२१ पासून तेजस संतोषराव देशमुख यांनी वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त सलग पाच वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये
शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप,
शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक साहित्य वाटप,
रस्त्यावरच्या गरजूंना कपडे, अन्नधान्य, छत्र्या व ब्लँकेटचे वाटप,
रुग्णांना अल्पोपहाराचे वाटप,
तसेच यावर्षीचे मोफत नेत्र तपासणी शिबीर
असे उपक्रम उल्लेखनीय ठरले आहेत.
या कार्यक्रमाला भाजपा नांदेड जिल्हा कोषाध्यक्ष दिगंबर टिपरसे, सेवा सहकारी सोसायटी बारडचे चेअरमन अनिल शामराव देशमुख, व्हाईस चेअरमन गोविंद बने, प्रदीप किशनराव देशमुख, देवराव देशमुख, आकाश देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, रामेश्वर देशमुख, आप्पाराव देशमुख, श्रीकांत देशमुख, अनिल मुपदे, जि. एस. सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजनकर्ते तेजस देशमुख यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व “दरवर्षी वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा संकल्प कायम ठेवीन” असे आश्वासन दिले.

