बामसेफचे 39 वे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात

बातमी Share करा:

म्हसवड : बामसेफचे 39 वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 25 ते 28 डिसेंबर 2022 यशकायी डी. के. खापर्डे मेमोरियल ट्रस्ट चे राष्ट्रपिता जोतिबा फुले सामाजिक क्रांती संस्थान, रिंगणाबोडी नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातून बहुसंख्य कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोहिते यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन महात्मा गांधी उद्यानिकी व वानिकी विश्वविद्यालय दुर्ग चे कुलपती डॉ. आर. एस. कुरील यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सत्रात  फ्रान्स येथील राजकिय विश्लेषक डॉ. क्रिस्टीफ जाफरलॉट, सामाजिक क्रांती महागठबंधन दिल्ली चे संस्थापक न्यायमूर्ती वीरेंद्र सिंह,  विशेष पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतील. उद्घाटन सत्राची अध्यक्षता बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गणोरकर करणार आहेत.
    बामसेफ ही सामाजिक संघटना मागील 40 वर्षापासून संविधानिक मानवी मूल्यांवर आधारित राष्ट्र निर्माणासाठी कार्यरत आहे. विषमतावादी, जातीयवादी  नष्ट करून मानवी मूल्यांवर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश या संघटनेचा आहे. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय प्रश्नांबरोबर इतरही समस्यांची समीक्षा, त्यांचे आकलन आणि सांघिकरित्या ते प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने ‘बामसेफ’ प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमाचे संघटनेच्या वतीने आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर येथे 39 व्या आधीवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.  चार दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात आठ प्रबोधन सत्र, चार प्रतिनिधी सत्रांबरोबरच  एका समोरोपिय सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंजाबचे डॉ विनोद आर्या, सुनील खोब्रागडे, सर्वोच्च न्यायालयाचे अभिषेक चव्हाण, संयुक्त किसान मोर्चा च्या प्रतिभा शिंदे, डॉ सी बी यादव, कुरुक्षेत्र विश्व विद्यालयाचे डॉ सरवर चहल, बिहार चे डॉ. राकेश कुमार, प्रसिद्ध अर्थशास्त्री डॉ एस एस यादव, रिदम स्पर्श, डॉ मुनेश कुमार, अरब अमिरातीहून आशिष जीवने, राष्ट्रिय न्यायिक अकादमी चे माजी निदेशक डॉ जी मोहन गोपाल, जबलपूर उच्च न्यायालयाचे विनायक प्रसाद, संयुक्त जन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव, हनीफ हंसलोद , मप्र उच्च न्यायालयाचे रामेश्वर ठाकूर, ओबीसी सेवा संघाचे प्रदीप ढोबळे, दिल्ली विश्व विद्यालयाचे डॉ अफताब आलम, सत्येंद्र ठाकूर, मराठा सेवा संघाच्या वैशाली डोळस, सिंबायोसिस पुण्याच्या डॉ आभा आर्या, हैदराबादचे डॉ अरुणा गोगुलामंदा, सरफराज अहमद, जमिया मिलिया दिल्ली चे डॉ अरविंद कुमार इत्यादी  प्रख्यात समाजचिंतक, विश्लेषक आणि संशोधक विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. मूलनिवासी बहुजन समाजातील प्रबुद्ध नागरिकांनी तन-मन-धनाने या अधिवेशनात सहभाग  घ्यावा,असे आवाहन बामसेफचे सातारा जिल्हा सचिव सुशांत गायकवाड व जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोहिते यांनी  यांनी केले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!