लोणंद शहरात गांजा विक्री प्रकरणी मोठी कारवाई आरोपीकडून ३लाख ६७ हजार १०० रु. किमतीचा दोन स्विफ्ट गाड्या सह १४.६८४ कि.ग्राम गांजा जप्त
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाइम्स साताराजिल्हा प्रतिनिधी
समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अंमली पदार्थ गांजा याची विक्री, लागवड, वाहतूक करणारे इसमांचे विरुध्द कारवाया करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सातारा जिल्हयातील अंमली पदार्थ गांजाची विक्री, वाहतूक, लागवड करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. दि.२६ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी उपलब्ध मंगलेश भोसले रा. सोनगाव ता. बारामती जि. सोलापूर हा स्विफ्ट डिझायर क्रमांक एम.एच.१९ बी. एच. ९०५५ मधून अंमली पदार्थ गांजाची विक्री
करण्याकरीता येणार आहे.
त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना पथकासह नमुद इसमास ताब्यात घेवून त्याचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले. नमुद पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी सापळा लावून पोलीस अभिलेखावरील आरोपी व त्याचा साथिदार यास ताब्यात घेतले. नमुद दोन्ही इसमांच्या कब्जातून एकूण ३,६७,१००/- रुपये किमतीचा १४ किलो ९८४ ग्रॅम गांजा १४,००,०००/- रुपये किमतीची स्विफ्ट व स्विफ्ट डिझायर अशी दोन वाहने हस्तगत करुन त्यांचेविरुध्द लोणंद पोलीस ठाणे गु.र.नं. ४०० / २०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.