चोरीस गेलेल्या ७ तोळे सोन्याचे दागिन्याचा गुन्हा २४ तासात उघड करुन ३,लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे सर्व दागीने जप्त. वाठार पोलीसांची कारवाई.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाइम्स
सातारा जिल्हा प्रतिनिधी :

               वाठार पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कवडेवाडी येथील फिर्यादी सौ. उपा आनंदराव जगदाळे यांची सासु दिनांक ०९/०८/२०२३ रोजी मयत झालेने त्यांचा अंत्यविधी करणेसाठी रात्रौ ०१.०० वा सुमारास फिर्यादी हे सातारा येथुन कवडेवाडी येथे रिक्षाने आले असता त्यांनी सासुचे अंत्यविधीसाठी जाताना त्यांचे गळ्यातील सोन्याचे ७ तोळे वजनाचे दागीने त्यांच्या मालकीच्या रिक्षाच्या सिट खाली पर्समध्ये ठेवुन अंत्यविधीसाठी गेल्या व अंत्यविधी करुन परत आल्यानंतर त्यांचे दागीने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे लक्षात आले म्हणुन त्यांनी वाठार पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा रजि नं २३६ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे तक्रार दाखल केली होती.

सदर गुन्ह्याची तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे अनुषंगाने श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापु बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. राजेंद्र शेळके उप-विभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा व गेले मुद्देमालाचा तात्काळ शोध घेणेवावत सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार पोऊनि श्री. संदिप बनकर, पोलीस हवालदार उदय जाधव, पोलीस अंमलदार प्रशांत गोरे, गणेश इथापे यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेवुन संशयीत आरोपी नामे सुहास धनाजी फडतरे वय २९ रा. देगाव पाटेश्वर जि सातारा सध्या रा. कवडेवाडी ता कोरेगाव यास ताब्यात घेतले व त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास गुन्ह्यात अटक करुन चोरी केलेले गुन्ह्यातील एकुण ३ लाख, ६०हजार, रुपये किंमतीचे ७ तोळे वजनाचे सोन्याचे सर्व दागीने अटक आरोपी कडुन जप्त करण्यात आले आहेत. नमुद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार उदय जाधव हे करीत आहेत.

सदर कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस  अधीक्षक, सातारा व श्री. बापु बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!