शिवम अध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान घारे वाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलन बारा जानेवारी ते चौदा जानेवारी दरम्यान होणार आहे.हे तेविसावे संमेलन होत आहे.संस्थापक मा. इंद्रजित देशमुख (काकाजी) यांच्या प्रमुख मार्गद्शनाखाली स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने दर वर्षी युवा हृदय संमेलन होत असते.
प्रतिष्ठान च्या वतीने अखंड भारत भर न्यानाचा जागर सुरू आहे,युवा पिढीत सकारात्मक बदल घडवणे,निसर्गप्रेम उराशी बाळगून चांगला माणूस घडवणे, स्वतः मध्ये सकारात्मक बदल घडवणे हा एकच अखंड यज्ञ . इंद्रजित देशमुख यांनी गेले तेवीस वर्षे आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सुरू केला आहे.अनेक अधिकारी, व्याख्याते ,कवी,शिक्षक,व्यावसायिक याच संस्कारातून घडले आहेत. शिवम आनंदधाम येथे यावर्षीही जानेवारी मध्ये होणाऱ्या युवा संमेलनात विवध दिग्गजांची व्याख्याने होणार आहेत.यामध्ये बारा जानेवारी पहिल्या दिवशी
नागपूर येथील यशस्वी उद्योजक जयसिंगराव चव्हाण (बिन पंखांची गरूडभभारी…), मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा कवितेचे अकोला येथील कवी ,प्रबोधनकार अनंत राऊत (मी आणि माझ्या कविता), टी.व्ही.अँकर श्रीमती अनघा मोडक (जगण्याचे गाणे होताना), आळंदी येथील स्नेहवन संस्थापक अशोक देशमाने(आय. टी. इंजिनिअर ते स्नेह वणचा प्रवास)ही व्याख्याने होतील.संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सावंतवाडी येथील कोकणी रान माणूस प्रसाद गावडे ( श्वाश्र्वत पर्यटन), जेष्ठ नेत्र तज्ञ पद्मश्री तात्याराव लहाने (स्वप्न बघा …स्वप्न जगा..),श्रीमती शांताबाई यादव (पुरुषासाठी सलून चालविणारी देशातील पहिली स्त्री),आय. ए.येस.ओडिसा केडर विजय कुलंगे ( संघर्षाची यशस्वी गाथा) यांची मार्गदर्शने होणार आहेत.या दिवसाच्या सांग तेला कोल्हापूर येथील प्रा.सुरेश शुक्ल यांचा शहीद कुटुंबीयांना वंदन हा जागो हिंदुस्थानी देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे १४ जानेवारी रोजी सकाळी ह.भ.प.स्वामिराज भिसे यांचे नामसकिर्तन होणार आहे.शेतकरी नेते मा. राजू शेट्टी यांची मुलाखतीद्वारे ‘शिवार ते संसद’ असा जीवनपट उलगडा होणार आहे. दुपारच्या सत्रात . इंद्रजित देशमुख यांचे व्याख्यान होऊन संमेलनाचा समारोप केला जाणार आहे.
जास्तीत जास्त युवक युवतीनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासमवेत सर्व विश्वस्त, संचालक,शिवम साधक यांनी केले आहे. शिबिरार्थिची राहण्याची,जेवण तसेच नाश्ट्यची उत्तम सोय केली जाते अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.ऑनलाईन रजिस्ट्रेशन ची सोय केली आहे.अधिक माहितीसाठी ८०१०९२१०२० किवा ९३५९०४७३१५ या नंबरवर संपर्क करा.