उंब्रज येथील होणाऱ्या शिवस्मारकास रामकृष्ण वेताळ यांच्याकडून 2,22,222 रुपये देणगी स्वरूपात श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान उंब्रज यांच्याकडे सपूर्त

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
उंब्रज कराड श्रीकांत जाधव

उंब्रज तालुका कराड येथे बाजारपेठेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात यावा अशी समस्त उंब्रज तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची इच्छा होती. ह्या इच्छेला मूर्त स्वरूप देण्याचे काम श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानने उंब्रज यांनी हाती घेतले आहे आणि आत्ता उंब्रज मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्या उभारणीचे काम उस्फूर्तपणे चालू आहे नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद या शिवकार्यात लाभत आहे.

कारण उंब्रज ता कराड येथील बाजारपेठे मधील अश्वारूढ पुतळ्यामुळे उंब्रज गावच्या वैभवात भर पडणार आहे तसेच नवीन पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार रुजण्यासाठी मदत होणार आह. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यासाठी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानने या शिवकार्यात सामील होण्यासाठी जनतेस वेगवेगळ्या माध्यमातून आव्हान देखील केले होते .या आव्हानाला प्रतिसाद देत रामकृष्ण वेताळ (भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस) यांनी देणगी स्वरूप दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस 2,22222 रुपये देणगी स्वरूपात शिवयोद्धा प्रतिष्ठान कडे सुपूर्त केले आम्हाला या शिवकार्यात सामील होण्याचे संधी मिळाली हे आमच्यासाठी भाग्याचे आहे असे रामकृष्ण वेताळ याप्रसंगी म्हणाले तसेच महाराष्ट्रातील गड किल्ले महाराजांचे शिवस्मारक हे छत्रपतींच्या शौर्याचे प्रतीक असल्याचे रामकृष्ण वेताळ यांनी याप्रसंगी सांगितले.

20 सप्टेंबर रोजी संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज हभप श्री शिरीषजी महाराज मोरे देहूकर यांचे व्याख्यान उंब्रज मध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी हभप मोरे महाराज यांचे समवेत रामकृष्णजी वेताळ यांनी बाजारपेठेतील सुशोभिकरन परिसरास भेट दिली होती. व झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून मार्गदर्शन केले होते. तसेच श्री.छ. शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ मूर्तीस सहकार्य करण्याचा श्री शिव योद्धा प्रतिष्ठानला शब्द दिला होता.राजकारण व समाजात वावरत असतानासुद्धा दिलेला शब्द प्रमाण मानून रामकृष्ण वेताळ यांनी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना स्वतः फोन करून त्यांच्या कार्यालयात निमंत्रित केले होते. व उंब्रजच्या वैभवात भर पडणार अशा शिवकार्यास सढळ हाताने त्यांनी मदत केली व भविष्यातही सहकार्य करण्याचे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना दिले. . श्री छ शिवाजी महाराज यांच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणारे शिवभक्त रामकृष्ण वेताळ यांचे श्री शिव योध्दा प्रतिष्ठान उंब्रज व उंब्रज परिसर यांचेवतीने जाहिर आभार. याप्रसंगी मानण्यात आले.

उंब्रज मधील होणाऱ्या शिवस्मारकास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे या शिवस्वारकामुळे उंब्रजच्या वैभव मध्ये निश्चितच भर पडेल यात शंका नाही.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!