पत्रकार सल्लाऊद्दिन चोपदार यांना 2024 चा राज्यस्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ऊत्कृष्ट पत्रकार पुरस्कार” जाहीर

बातमी Share करा:

 

व्हिजन 24 तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड :
आदिवासी धनगर साहित्य संमेलनामार्फत दरवर्षी दिल्या जाणारा अत्यंत प्रतिष्ठित असा राज्यस्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ऊत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ” म्हसवड ( ता.माण ) येथील “सकाळ”चे जेष्ठ प्रतिनिधी पत्रकार सल्लाऊद्दिन चोपदार ऊर्फ सलीमभाई पटेल यांना जाहिर करण्यात आला आहे.

शाल,श्रीफळ,मानाचा फेटा, धनगरी काठी अन् घोंगडे, सन्मान पत्र व सन्मान चिन्हं असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

शनिवार व रविवार ( ता.24 व 25 फेब्रुवारी ) सोलापुर ( बेलाटी ) येथे दोन दिवशीस हे पाचवे आदिवासी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे.
शनिवारी (ता.24) या पुरस्काराचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते पत्रकार सल्लाऊद्दिन चोपदार यांना या पुरस्काराने सन्मानित करुन त्यांच्या पत्रकारितेतील गेली 33 वर्षातील कार्याचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती
या साहित्य संमेलनाच्या पदाधि-का-यांनी आयोजित केलेल्या बैठकीत दिली.

सोलापुर येथील पाचव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनात पत्रकार सल्लाऊद्दिन चोपदार यांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ऊत्कृष्ट पत्रकार पुरस्कार “जाहिर झाल्याबद्दल  माजी नगराध्यक्ष नितीनशेठ दोशी,इंजि. सुनील पोरे, पत्रकार अहमद मुल्ला, सचिन मंगरुळे,पोपट बनसोडे, विजयकुमार भागवत, विजय टाकणे, तसेच म्हसवड मधील विविध मान्यवर यांचेकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!