येथील मासाळ टेक येथील मैदानावर सिद्धिविनायक बॉईज संघा तर्फे क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते या सामन्यात प्रथम क्रमाकासाठी २०००रु व द्वितिय क्रमांकासाठी १००० रुपए अशी बक्षिसे ठेवण्या आली होती या सामन्यातील प्रथम क्रमांकाचे २००० रु चे बक्षिस आण्णाभाऊ साठे बॉईज संघाने पटकावले या बक्षिसाचे वितरण भाजपा ओबीसी मोर्चा युवक प्रदेशाध्यक्ष करण सुनील पोरे यांचे चिरंजीव मास्टर क्रिशव पोरे यांचे हस्ते वितरीत करण्यात आले
मासाळ टेक म्हसवड मैदानावर संपन्न झालेल्या भव्य क्रिकेट सामन्यात नऊ क्रिकेट संघानी सहभाग नोंदवला होता शेवटच्या अण्णाभाऊ साठे बाॅईज क्रिकेट संघ म्हसवड व वैभव बाॅईज क्रिकेट संघ म्हसवड या दोघांच्या अटी तटीच्या सामन्यात अण्णाभाऊ साठे बाॅईज क्रिकेट संघ म्हसवड याने प्रथम क्रमांक मिळवला तर वैभव बाॅईज क्रिकेट संघ म्हसवड या संघाने द्वितिय क्रमाक पटकावला या बक्षिस वितरण प्रसंगी करण पोरे उपस्थित रहाणार होते परंतु काही कारणा निमित्त त्यांना बाहेर गावी जावे लागले त्यामुळे सर्व खेळाडूंच्या आग्रहास्तव मास्टर क्रिशव पोरे याचें हस्ते बक्षिस वितरण समारंभ आयोजित केला होता या सामन्यात सहभागी झालेले सर्व क्रिकेट संघ व विजेत्या संघाला क्रिश पोरे यांनी शुभेच्छा दिल्या