18 व्या राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात कोल्हापूर परक्षेत्राची उत्तुंग भरारी.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाइम्स
सातारा जिल्हा प्रतिनिधी
पोलीस दलामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते असा कर्तव्य मेळावा जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व देशपातळीवर घेण्यात येतो. दिनांक 01/09/2023 ते 09/09/2023 या कालावधीत 18 वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा 2023 हा गुन्हे अन्वेषण विभाग, म.रा.पुणे यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 1 व 2 येथे आयोजित करण्यात आलेला होता. सदर पोलीस कर्तव्य मेळाव्याकरीता महाराष्ट्र राज्यातुन एकुण 25 संघातुन स्पर्धक सहभागी झाले होते. याकरीता कोल्हापूर परिक्षेत्राकडुन श्री. संदीप जगताप, पोलीस निरीक्षक, श्री.अविनाश माने, प्रफुल्ल कदम व दिलीप ढेरे सहा. पोलीस निरीक्षक व 21 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.
सदर 18 वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सांयटीफीक एड टु इन्व्हेस्टीगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडीओग्राफी, घातपात विरोधी तपासणी, कॉम्प्युटर अवेरनेस व श्वानांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्र संघाने एकूण 6 सुवर्ण, 1 रौप्य अशी पदके पटकावली. तसेच कॉम्प्युटर अवेरनेस मध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळवले यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राला सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवून कोल्हापूर परिक्षेत्राचा नांवलौकीक महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये वाढविला आहे.सदर कर्तव्य मेळाव्यातील चांगल्या कामगिरीसाठी मा. श्री. सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र,
कोल्हापुर, श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. के. एन. पाटील, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निवृत्त पोलीस उप अधीक्षक श्री. संभाजी पाटील, श्रीमती मोरे, सपोनि फॉरेन्सीक व पथक, श्री. गौरव वऱ्हाडे प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण कॉलेजचे फॉरेन्सीक एक्सपर्ट, श्री. संतोष शिंदे पोहवा आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांचे मा. श्री. रजनिश शेठ, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. श्री. सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापुर, श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापु बांगर,अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. के. एन. पाटील, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय सातारा यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.