या सरकारचा निकाल हा घटनात्मक तरतुदीनुसार शेड्युल 10 प्रमाणे लागल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार ही अपात्र ठरतील :आ. नानासाहेब पटोले
व्हिजन २४ तास न्युज (संपादक ;अहमद मुल्ला )
म्हसवड :
राज्यातील सरकार हे फसवणुक सरकार असुन या सरकारचा निकाल हा घटनात्मक तरतुदीनुसार शेड्युल 10 प्रमाणे लागल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार ही अपात्र ठरतील असा विश्वास राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आ. नानासाहेब पटोले यांनी व्यक्त केला.
त्यांनी म्हसवड येथील काँग्रेस कार्यकर्ते विकास गोंजारी यांच्या घरी धावती भेट दिली असता पत्रकारांशी संवाद साधताना आ.पटोले यांनी वरील वक्तव्य केले, यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, डॉ. धवलसिंह मोहिते- पाटिल,प्रा. विश्वंभर बाबर,माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, , दाऊद मुल्ला, निलेश काटे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. पटोले म्हणाले की राज्यात काँग्रेस ला चांगले दिवस येवु लागले आहेत, माण तालुक्यात मी एका महिन्यात दुसऱ्यांदा येत आहे, माण तालुका हा कायम दुष्काळी म्हणुन ओळखला जात असला तरी याच तालुक्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरघोस निधी देवुन माण तालुक्यातील सिंचन योजना मार्गी लावल्या आहेत. या तालुक्याने नेहमीच काँग्रेस पक्षाची पाठराखण केली आहे, त्यामुळे येथील लोक प्रतिनिधि सध्या कोणत्या पक्षात आहेत याचे सामान्य जनतेला काहीही देणं घेणं नाही ती काल ही – काँग्रेस सोबत होती आज ही आहे अन् उद्याही राहिल असा विश्वास व्यक्त करताना आ. पटोले यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माण-खटावमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचाच आमदार निवडुन येईल असे स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले की राज्यात महाविकास आघाडी ही भक्कम असुन यापुढील सर्व निवडणुका आम्ही एकत्रीत लढुन राज्य सरकार ला सत्तेतुन खाली खेचू, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या सरकारने मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले मात्र सत्ता येताच त्यांनी आरक्षणाचा प्रश्न लटकवत ठेवत या समाजाची घोर फसवणुक केली असल्याचा आरोप आ. पटोले यांनी केला. तर महाविकास आघाडी मध्ये कोणताही बेबनाव नसल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले. यावेळी स्नेहल जगताप यांच्या शिवसेना प्रवेशावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले यांनी सांगितले की आम्ही स्नेहल जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देवु नये असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना सांगितले होते तरी ही त्यांनी जगताप यांना आपल्या पक्षात घेतले आहे, मात्र भविष्यात काँग्रेस जगताप यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा करणार असल्याचे शेवटी आ. पटोले यांनी सांगितले तर कर्नाटकामध्ये राष्ट्रीय काँग्रेस च सत्तेवर येईल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
चौकट –
- गोंजारी परिवाराने केले पटोले यांचे स्वागत –
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांचे जंगी स्वागत काँग्रेस कार्यकर्ते विकास गोंजारी यांनी केले, यावेळी पटोले हे सामान्य कार्यकर्त्याच्या घरी आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
- शांताराम माने यांच्या घरी पटोले यांचे स्वागत –
शांताराम माने यांच्या घरी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब पटोले यांचा सत्कार करण्यात आला यावेळीअल्प संख्या क सेलचे अध्यक्ष गबबारभाई काझी, विशाल माने, शिवाजी यादव, जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, बाबासाहेब माने नानासाहेब राजमाने हे उपस्थित होते