गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द प्रशालेत कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
रयत शिक्षण संस्थेचे, गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द ता.माण, जि.सातारा या प्रशालेत कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३६ वा जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला.*
डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. नदाफ एन. डी. सर यांचे शुभहस्ते झाले. प्रतिमा पूजन करणेसाठी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मा.श्री. मधुकर, मोरे (आबा ), गोंदवले खुर्द च्या विद्यमान सरपंच मा.सौ. सिंधूताई गाढवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री. कैलास पोळ, शाळा विकास समितीच्या उपाध्यक्ष सौ. वैशाली कुलकर्णी, पालक, श्री.चंद्रकांत लोखंडे, श्री. अजित भोंडवे,श्री. कैलास कदम,श्री.दादासाहेब अवघडेइ. मान्यवर उपस्थित होते.
प्रतिमापूजनानंतर डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांची मिरवणूक सजावट केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाजत – गाजत गोंदवले खुर्द गावात आली. सोबत पन्नास विद्यार्थीनींचे लेझीम पथक व आर.एस.पी. पथक होते.समाजमंदिरासमोर लेझीम पथकाने, संगीताच्या तालावर सुंदर लेझिम नृत्य सादर केले. या लेझिम पथकाला व आर.एस.पी.पथकाला विद्यालयातील कलाशिक्षक तसेच आर.एस. पी.शिक्षक श्री. सादिक शेख सर यांचे मार्गदर्शन मिळाले.कलारंजन गणेश मंडळाच्या वतीने विद्यालयातील
मुख्याध्यापक श्री. नदाफ सरांचा, व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान श्री. विजयकुमार अवघडे यांच्या हस्ते करण्यात आला. गावातून मिरवणूक सवाद्य विद्यार्थी, विद्यार्थीनी-समवेत लेझीम नृत्य करत काढण्यात आली मिरवणुकीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील विविध ठिकाणी माता पालक, महिला ग्रामस्थ, पुरूष ग्रामस्थ माजी विदयार्थी विद्यार्थिनींनी केले शेवटी मारुती मंदिरासमोर मिरवणूकीची सांगता झाली.सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना विद्यालयाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.या मिरवणूक सोहळ्यासाठी गोंदवले खुर्द पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यालयातील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारीउपस्थित होते
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नदाफ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला. श्री. शेख सर, श्री. उगलमोगले सर, श्री.जाधव सर, श्री.माने सर, श्री.घोडके सरसौ. शेडगे मॅडम, विद्यालयाचे लेखनिक श्री.जगदाळे सर शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती अवघडे मॅडम,श्री. घाटगे अण्णा,विद्यार्थी ,विद्यार्थीनी सर्वांच्या सहकार्याने मिरवणूकीचा कार्यक्रम उत्कृष्ट रित्या यशस्वीपणे पार
पडला.