खटाव तालुक्यातील वडूज येथील पंचायत समिती मधील ग्रामविस्तार अधिकाऱ्यास 12 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख (पोलीस टाइम्स रिपोर्टर )
गोंदवले खुर्द:
खटाव तालुक्यातील वडूज येथील पंचायत समिती मधील ग्रामविस्तार अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी 12 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार ग्रामसेवक असून लोकसेवक संजय विलासराव सोनावले, ग्रामविस्तार अधिकारी पंचायत समिती वडूज हे तक्रारदार यांना कार्यालयीन कामकाजामध्ये शुल्लक चुका काढून तक्रारदार यांचा मानसिक छळ करीत असत. तसेच तक्रारदार यांचा वरिष्ठांना कसूरी अहवाल पाठवेन, तक्रारदार यांना निलंबित करेन अशा धमक्या देत असत. अशाच एका प्रकरणामध्ये तक्रारदार यांना लोकसेवक यांनी कारणे दाखवा नोटीस दिली होती. सदरच्या कारणे दाखवा नोटीसीच्या अनुषंगाने तक्रारदार यांचेवर कारवाई न करण्यासाठी लोकसेवक संजय सोनावले यांनी तक्रारदार यांचेकडे आज (दि. 25/05/2023) पडताळणी दरम्यान 12 हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारताना लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक पुणे श्री अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सातारा श्रीमती उज्वल वैद्य, पो. ना. प्रशांत नलवडे, पो. कॉ. तुषार भोसले,पो ना निलेश चव्हाण, मारुती यांनी ही कारवाई केली असून यामुळे खटाव सह सर्वत्र खळबळ उडाली आहे. जनतेतून समाधान व्यक्त