म्हसवड ते माळशिरस हायवेवर टाटा जीप व बोलेरो पिकअप गाडीची धडक अपघातात एक ठार एक जखमी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
दिनांक 16/11/2023 रोजी सकाळी 07:00 वा चे सुमारास मौजे म्हसवड ता.माण जि.सातारा गावचे हद्दीतील म्हसवड ते माळशिरस जाणारे हायवे रोडवर लांब मळा येथे माळशिरसकडुन म्हसवडकडे जाणारे टाटा जीप गाडी क्र. MH 11 BL 7845 हिस म्हसवड कडुन माळशिरस बाजुकडे जाणारी महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप गाडी क्र. MH 13 DQ 0368 वरील अज्ञात चालकाने हयगयीने अविचाराने भरधाव वेगात येवुन गाडीस जोराची धडक देवून अपघातात गाडीचे नुकसान करुन अपघातात माझा भाऊ नवनाथ रघुनाथ सावंत वय 38 वर्षे यास गंभीर दुखापत करुन भावजय सौ. शिल्पा नवनाथ सावंत वय 35 वर्षे दोन्ही रा. जायगाव ता. खटाव जि.सातारा हीचे मरणास कारणीभूत झाला व त्यांना दवाखान्यात उपचाराकरिता दाखल न करता पळुन गेला आहे म्हणुन भाऊ सुखदेव रघुनाथ सावंत रा.जायगाव ता खटाव याने महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप गाडी क्र. MH 13 DQ 0368 वरील अज्ञात चालकाविरुध्द म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!