स्मित प्रोऍक्टिव्ह अबॅकस म्हसवड येथील विध्यार्थांची नॅशनल अबॅकस स्पर्धेत गगनभरारी

बातमी Share करा:

म्हसवड : कोल्हापूर शहरात पार पडलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटीशन २०२२-२३ मध्ये स्मित प्रोऍक्टिव्ह अबॅकस म्हसवड व पिलीव चे सर्व विद्यार्थी विजयी झाले.
      स्मित प्रोऍक्टिव्ह अबॅकस म्हसवड व पिलीव १७ ट्रॉफी आणि ३४ गोल्ड मेडल मिळाले. ६ मिनिटात १०० गणिते सोडविणे असे स्पर्धेचे स्वरूप होते. स्पर्धेच्या युगात कमीतकमी वेळेत गणितीय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करत आपली बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी या स्पर्धा पद्धतीचा उपयोग होत असून यामुळे विध्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक जडण घडणीत मोलाची भर पडत असते.
या स्पर्धेत कुंदन तानाजी फडतरे (प्रथम क्रमांक), श्रेया सचिन विरकर (प्रथम क्रमांक) शौर्या तानाजी खांडेकर (प्रथम क्रमांक), हर्ष सुहास कोल्हे (प्रथम क्रमांक)
स्मित शरद जाधव (द्वितीय क्रमांक), अनिकेत युवराज बाबर (द्वितीय क्रमांक), अभिराज गणेश देशमुख (द्वितीय क्रमांक),अमित संतोष ढवळे (द्वितीय क्रमांक), अबोली रतन खाडे (तृतीय क्रमांक),संचिता प्रकाश काटकर (तृतीय क्रमांक), धिरज दिलीप ढवळे (तृतीय क्रमांक),आयुष गणेश देशमुख (तृतीय क्रमांक),विराज युवराज बाबर (चतुर्थ क्रमांक), वेदांत महादेव पुकळे (चतुर्थ क्रमांक), वेणुगोपाल श्रीकांत आरवे (चतुर्थ क्रमांक), शिवम बाबा कोडलकर (पाचवा  क्रमांक), शौर्य जयवंत कारंडे (पाचवा क्रमांक) हे विध्यार्थी ट्रॉफी 🏆विनर ठरले.
स्पृहा गोंजारी, स्मित गोंजारी, मिथिलेश सावंत, आर्यराज नरळे, खुशी कोळी, अथर्व जळक, अर्णव जळक, अवधूत प्रथमशेट्टी, शुभम पवार, प्रचिती नरळे, अनन्या प्राथशेट्टी, संचित काळेल, आरुष आर्वे, रुद्र भोते, कृष्णा आर्वे, तनिष्का जाधव, प्राप्ती व्होरा, हर्ष कारंडे, सुजल काटकर, ईश्वर कोळेकर, सार्थक देशमुख, तन्मय खटावकर, लावण्या पवार, सान्वी व्होरा, प्रणिती चांडवले,आयुष सरतापे, ईशान व्होरा, पृथ्वीराज खटावकर, शुभम माने,श्रुती खटावकर, अक्षता चांडवले,अल्तमेश मुजावर, दानिश मुजावर, यांनी उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड मेडल🥇 मिळविले. तसेच स्मित प्रोऍक्टिव्ह अबॅकस म्हसवड ला बेस्ट अबॅकस सेंटर हा विशेष पुरस्कार मिळाला. सदर स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून १२०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. सदर कार्यक्रमात प्रोऍक्टिव्ह अबॅकस डायरेक्टर गिरीश करडे, सौ. सारिका करडे ,अजय मणियार, सौ. ज्योती मणियार, सौ. तेजस्विनी सावंत व प्रोऍक्टिव्ह अबॅकस कोल्हापूर चे सर्व सदस्य उपस्थित होते.
विध्यार्थ्यांना स्मित प्रोऍक्टिव्ह अबॅकस म्हसवड च्या संस्थापिका सौ. अनिता जाधव मॅडम व शरद जाधव सर व अबॅकस टिचर काजल कोडलकर, अतिश फाळके सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!