शाळा हि देशाची आदर्श भावी पिढी घडविण्याचे माध्यम: राजकुमार भुजबळ
म्हसवड
शाळा हि देशाची आदर्श भावी पिढी घडविण्याचे माध्यम असून, माता पित्यांसह गुरुजनवर्गही आपले दैवत आहेत, ही भावना प्रत्येक विद्यार्थ्यांनी मनी बाळगून, गुरूजनांबद्दलचा आदर कायम मनात ठेवल्यास प्रत्येक विद्यार्थी हा या देशाचा प्रतिभावंत नागरिक घडणार असल्याचे मत म्हसवड पोलीस ठाण्याचे स पो नि राजकुमार भुजबळ यांनी व्यक्त केले.
वरकुटे- मलवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत सरतापे कुटुंबियांतर्फे माण दिवंगत शिक्षण विस्ताराधिकारी निवृत्ती सरतापे गुरूजी यांच्या १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी विचारमंचावर माजी डी वाय एसपी दत्तात्रय सोनवणे
सरपंच बाळकृष्ण जगताप, तातोबा बनसोडे, पत्रकार सरतापे, राणाप्पा आटपाडकर, बाई सरतापे, माजी सरपंच बापुसाहेब बनसोडे, तेजा जाधव, मिनाक्षी बनसोडे, सुखदेव बनसोडे, अँड सतिश जगताप, चेतन बनसोडे, बापुराव बनसोडे, आदी मान्यवर उपस्थित होते. भुजबळ पुढे म्हणाले की, माण तालुका हा बुद्धिवंतांची खाण असल्यानेच वरकुटे मलवडीसह माण तालुक्यातील अनेक अधिकारी वर्ग महाराष्ट्रासह संपूर्ण देशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. ते केवळ शिक्षणामुळेच म्हणूनच शिक्षणात उपयोगी येणाऱ्या साहित्याचे वाटप करून, सरतापे कुटुंबियांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे यावेळी दत्तात्रय सोनवणे म्हणाले की, छडी लागे छमछम या म्हणीप्रमाणे वरकुटे- मलवडीच्या पंचक्रोशीत आदर्श शिक्षक असलेल्या सरतापे गुरुजींसह अनेक गुरुजनांनी मायभुमीत आम्हांसारखे असंख्य अधिकारी घडवले. आम्हा सर्वांचे आजचे चांगले दिवस हे या गुरूजनांचीच देणं असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दत्ता चव्हाण, महादेव सुतार, जालिंदर वाघमोडे, संगीता मेरूकर, पोपट लोंढे, उ त्तम बनसोडे गौतमी सिद्धार्थ बनसोडे
सुषमा सरतापे, निखिल बनसोडे रणजीत चव्हाण, दाजी बनसोडे, मधुकर चव्हाण, अक्षय राऊत. यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक एम डी चंदनशिवे यांनी केली. तर शेवटी आभार आप्पा सरतापे यांनी मानले.