विद्यार्थी शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञानात कुशल व्हावीत यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरकरवाडी येथे बालबाजार भरविण्यात आला.

बातमी Share करा:

एकविसाव्या शतकात मुलांना शैक्षणिक विकासाबरोबर व्यवहार करता यावेत,दैनंदिन जीवनात खरेदी विक्री, नफा तोटा याबरोबर रुपये पैश्याचे व्यवहार यांची योग्य प्रमाणात देवघेव करता यावी हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून शाळेने हा वैशिष्ट्य पूर्ण उपक्रम राबविला .या उपक्रमात गावातील पालकांनि भरभरून प्रतिसाद दिला. भाजी पाला,यासह चिकन बिर्याणी,भेळ,इडली या सारखे पदार्थावर सगळ्यांनी ताव मारला.गावातील महिला पालक खरेदीसाठी आल्या होत्या.मुलांनी ग्राहकांकडून  योग्य किंमत घेऊन  चांगला माल दिला.प्राध्यापक आदर्श शिक्षक विठ्ठल सजगाणे  यांनी बाजारात फेरफटका मारून खरेदी केली व बालकांचे कौतुक केले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका अनिता तोरणे,पल्लवी जगताप,कांतीलाल खाडे, प्रमिला इंगवले, शुभांगी रणदिवे ,पूनम शेंडे  यांनी प्रयत्न केले. मुख्याध्यपक सुशील त्रिगुणे यांनी नियोजन केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!