म्हसवडकर नागरीकांनी अजून किती दिवस धुळ खात जगायचे याची कोणी जबाबदारी घेणार आहे की नाही? : निवृत्त अभियंता सुनिल पोरे

बातमी Share करा:

म्हसवड :
माणगंगा नदिवरील पुलापासून ते माळशिरस चौकापर्यंतचा खनुन ठेललेल्या  सातारा पंढरपूर रोडवर खड्डे बुजवण्याठी नुसती माती टाकलेली असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामुळे रस्त्याकडेच्या लहानमोठ्या दुकानदाराना दिवसभर धुळ खात बसावे लागत आहे  त्यांचा  धंदा बंद पडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे   अकारण म्हसवडकरांना खुप मोठा त्रास सहन करावा लागत असुन हा नागरिकांना होणारा  त्रास असह्य झाल्यानेच म्हसवड येथील निवृत्त अभियंता सुनील पोरे यांनी याला जबाबदार कोण? याचा जाब विचारणारे भले मोठे फ्लेक्सच येथील चौका चौकात लावून या समस्याकडे सर्वांचे लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न केला आहे,  हे फ्लेक्स सध्या म्हसवडकरांकडुन सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. याला जबाबदार कोण असा सवाल करुन याची जबाबदारी कोणीच घेणार नसेल तर २६ जानेवीरी रोजी मोठे आंदोलन करणार असल्याचे इंजि.सुनिल पोरे यांनी  इशाराही  दिला आहे
 गत पाच ते सहा वर्षापासून सुरु असलेले सातारा पंढरपूर रोडच्या फोरलेनचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असुन म्हसवड पालिका हद्दीतील  माणगंगा नदी पासून माळशिरस चौक हा रस्ता गेली सहा वर्षझाले  नुसता खनून ठेवलेला आहे या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहे याबाबत अनेक संस्था संघटनानी आवाज उठवल्या नंतर     ह्या रस्त्यावरील खड्डे नुसती  माती टाकून  भरुन घेतले  माती टाकून भरलेल्या  या रस्त्यावरुन वाहने  जाताना व येताना मोठ्या प्रमाणात धुराळा उडत आहे पुसेगाव  गोंदवले याठिकाणी देखील असेच रस्ते आहेत मात्र त्या रस्त्यावर धुळ उडू नये म्हणून रोज टॅंकरने पाणी मारण्यात येते मग म्हसवडलाच का नाही ? या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक हॉटेल्स, चिकन सेंटर, फळांची दुकाने, मोटरसायकल गॅरेज, भांड्याची दकाने, किराणा मालाची दुकाने अशी अनेक छोटे मोठे व्यावसायिक आहेत सध्या या रस्त्यारुन जाणाऱ्या येणाऱ्या वाहनामुळे या सर्व दुकानात धुळीचे साम्राज्य पसरले आहे सर्व दकानदार दिवसभर तोंडाला मास्क लाऊन दुकानात बसलेले दिसत आहेत  महामार्गावरुन उडणाऱ्या धुळीमुळे त्यांना आपले व्यावसाय बंद करण्याची वेळ आली आहे उडणाऱ्या धुरळ्यामुळे ग्राहक दुकानात येत नाही आलेच तर धुळ बघुन काहीही खरेदी करत नाहीत त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे या रस्त्यावर दररोज दिवसातून दोन वेळा पाणी मारले तर ही समस्या दूर होऊ शकेल    नेमकी हीच व्यथा सुनील पोरे यांनी फ्लेक्सच्या माध्यामातुन मांडत यावर प्रशासनालाच जाब विचारत यावर उपायोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला असल्याने अनेक म्हसवडकरांनी पोरे यांचे आभार मानत त्यांच्या या अनोख्या कल्पनेचे स्वागत ही केले आहे तर अनेकांनी सध्या हाच फ्लेक्स आपल्या स्टेटसवरही ठेवत पोरे यांना एकप्रकारे आपला पाठींबा दर्शविला आहे. हा फ्लेक्स सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने हा फ्लेक्सच संबंधित ठेकेदाराचे डोळे उघडेल अशी अपेक्षा म्हसवडकर जनतेतुन व्यक्त होत आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!